भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं; पण ICC संजू सॅमसनवर कारवाई करण्याची शक्यता, कारण काय?

Ind vs WI संजू सॅमसन सेलिब्रेशन T20 वर्ल्ड कप 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील (ICC World Cup 2026) सुपर-8 मध्ये काल भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थानही निश्चित केले. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरला.

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 195 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असताना गाठले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही सहावी वेळ आहे. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि इशान किशन अपयशी ठरले तेव्हा संजू सॅमसनने जबाबदारी स्वीकारली आणि 97 धावांची ऐतिहासिक खेळी केली. सॅमसनने या ऐतिहासिक खेळीत 12 चौकार आणि चार षटकार मारले.

संजू सॅमसनचं अनोखं सेलिब्रेशन- (Ind vs WI Sanju Samson)

दरम्यान, चौकार ठोकत सामना विजयी झाल्यानंतर संजू सॅमसनने हेल्मेट मैदानावर फेकून एक अनोखं सेलिब्रेशन केलं. संजूच्या या सेलिब्रेशनावर आता सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होत आहेत. हेल्मेट फेकल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्याला या कृत्यासाठी संजू सॅमसनला दंड करू शकते का?, असा सवाल विचारला जातोय. मात्र आयसीसीचे याबाबत नेमके नियम काय?, याबाबत जाणून घ्या…

संजू सॅमसनवर कारवाई होणार? (Sanju Samson Celebration)

संजूने आपले हेल्मेट मैदानावर फेकणे महागात पडू शकते. ICC त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकते. नियमांनुसार, खेळाडूंनी हेल्मेट किंवा बॅट मैदानावर फेकणे हे अयोग्य वर्तन मानले जाते. खेळाडूंनी केलेल्या अशा वर्तनाबद्दल खेळाडूंना दंड, डिमेरिट पॉइंट्स किंवा निलंबनाला सामोरे जावे लागू शकते.आयसीसी खेळाडू, पंच आणि मैदानावरील इतरांच्या सुरक्षिततेची खात्री करते. म्हणून, खेळाडूंना बॅट आणि हेल्मेटसारख्या वस्तू मैदानावर फेकण्यास मनाई आहे. यामुळे अनवधानाने दुखापत होऊ शकते.

गौतम गंभीर ऑन संजू सॅमसन – (गौतम गंभीर ऑन संजू सॅमसन)

भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतम गंभीरने संजू सॅमसनचे तोंडभरुन कौतुक केले. संजू सॅमसन हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये 3 शतके झळकावली आहेत. आम्हाला त्याची प्रतिभा नेहमीच माहिती होती. न्यूझीलंडविरुद्धची मालिका कठीण होती, कधीकधी त्याला विश्रांती देणे महत्त्वाचे असते. पण आम्हाला नेहमीच माहिती होते की, जेव्हा जेव्हा आम्हाला विश्वचषक सामन्यात संजू सॅमसनची गरज असेल तेव्हा तो येईल आणि कामगिरी करेल, असं गौतम गंभीर म्हणाला.

संबंधित बातमी:

Gautam Gambhir On Sanju Samson: 5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर….; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्ल्डकपचा टर्निंग पॉइंट

T20 World Cup 2026 Semi Final Schedule : 4 संघ, 3 सामने, 3 मैदान…; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.