सलमानच्या ‘तेरे नाम’ ने ‘बॉर्डर २’, ‘मर्दानी ३’ ला मागे टाकत केली इतकी कमाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सलमान खानचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘तेरे नाम’ या शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर सुरुवात मंदावली. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र चित्रपट बऱ्यापैकी चालला. तिसऱ्या दिवशी मात्र या चित्रपटाने ताबडतोड कमाई करत, बॉर्डर २”, मर्दानी ३” लाही मागे टाकले.

सलमान खान आणि भूमिका चावला अभिनीत ‘तेरे नाम’ ही दुःखद प्रेमकथा दिवंगत सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केली होती. चाहते हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. अखेर २७ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाची ‘द केरळ स्टोरी २’, ‘ओ रोमियो’ आणि ‘बॉर्डर २’ सोबत टक्कर झाली. यामुळे चित्रपटाच्या गल्ल्यावर परिणाम झाला होता. परंतु रविवारी मात्र तेरे नाम ने धोबीपछाड करत, ‘बॉर्डर २’ आणि ‘मर्दानी ३’ या दोन्ही चित्रपटांना कमाईच्या बाबत मागे टाकले.

‘तेरे नाम’ने रिलीजनंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये, 7.5 दशलक्ष इतकी कमाई केली. यामुळे सनी देओलच्या ब्लॉकबस्टर बॉर्डर २ च्या सहाव्या रविवारी झालेल्या कलेक्शनला मागे टाकले. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, बॉर्डर २ ने सहाव्या रविवारी म्हणजेच ३८ व्या दिवशी ₹२.५ दशलक्ष कमाई केली. तसेच मर्दानी ३ च्या पाचव्या रविवारी झालेल्या कमाईलाही मागे टाकले.

Comments are closed.