नागपुरातील स्फोट निष्काळजीपणामुळेच; मृतांच्या वारसांना 82 लाखांची मदत : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर एसबीएल कंपनी बॉम्बस्फोटावर चंद्रशेखर बावनकुळे : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे काल (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये आतापर्यंत 19 कामगार मृत्युमुखी पडले असून 23 जण जखमी आहे. जखमींपैकी 13 जण गंभीररित्या जखमी असून ते 70% पेक्षा जास्त भाजले आहेत्यामुळे. आज बैठकीत निर्णय झाले की पेसोचे अधिकारी, डिशचे अधिकारी आणि कामगार आयुक्त या विभागांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात करावे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई शिफारस करतील. त्यानंतर या अधिकाऱ्यांवर ( पेसो, डिश, कामगार विभाग) गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. सोबतचघटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आलं आहे. अशी महत्वाचे माहिती भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीय.
Nagpur SBL Company Blast : कंपनी कडून 75 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत
दरम्यानकेंद्र सरकारकडे ही या संदर्भात रिपोर्ट पाठवले जाईल. पीयूष गोयल यांच्याशी बोलले गेले आहे. पीयूष गोयल ने गेल्या काही काळात झालेल्या स्फोटांची माहिती मागितली आहे. जोवर SBL कंपनी बंद राहील, तोवर कामगारांना पगार दिले जाईल. कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्या स्किल डेव्हलपमंट बद्दल प्रशिक्षण दिले जाईल. SBL कंपनीमध्ये काही कामगारांचे मुळीच प्रशिक्षण झाले नव्हते.
मृतांच्या वारसांना कंपनी कडून 75 लाख रुपये, राज्य सरकार कडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये असे एकूण 82 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तर जखमींना 25 लाख रुपये दिले जाईल. जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल. अशी माहितीहे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
Chandrashekhar Bawankule : जे-जे दोषी आढळतील, सर्वांवर कारवाई होईल
दरम्यानघटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम रिपोर्ट येईल. जे-जे दोषी आढळतील, सर्वांवर कारवाई होईल. आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेहांची DNA चाचणी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. त्यांनतर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. जर अधिकारी दोषी असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई का करू नये? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.