Israel Iran War – कुवेतला जाणारे विमान कराचीला वळवले, केरळच्या तीन नागरिकांसह 8 हिंदुस्थानी नागरिक पाकिस्तानात अडकले
अमेरिका-ईस्राईल-इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशात तणावाचे वातावरण आहे. या संघर्षामुळे हवाई मार्ग बंद झाल्याने कुवेतला जाणारे विमान कराचीला वळवण्यात आले. यामुळे आठ हिंदुस्थानी नागरिक पाकिस्तानात अडकले आहेत. अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांमध्ये तीन केरळचे रहिवासी आहेत.
‘नोर्का रूट्स’ (Norka Roots) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पलक्कड येथील कृष्णदास, त्यांची पत्नी डॉ. रेश्मी मेनन आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी स्मृती मेनन यांच्यासह आठ हिंदुस्थानी नागरिक हे अझरबैजानमधील बाकूहून शारजाहमार्गे कुवेतला जात होते. मात्र आखाती देशांतील संघर्षामुळे अनेक देशांनी त्यांचे हवाई मार्ग बंद केल्याने कुवैतला जाणारे एअर अरेबियाचे विमान कराचीकडे वळवण्यात आले. यामुळे आठ हिंदुस्थानी नागरिक कराची विमानतळावर अडकून पडले आहेत.
कराची विमानतळावर अडकलेल्या नागरिकांना मदत पुरवण्यासाठी हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कात आहेत. प्रवाशांना शक्य तितक्या लवकर हिंदुस्थानात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे नोर्का रूट्सने सांगितले. आखाती देशांतील वाढत्या युद्धामुळे अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याने जगभरातील हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे.
Comments are closed.