Israel Iran War – नेत्यान्याहू यांचे भवितव्य अंधारात! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा इराणचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणनेही प्रतिहल्ला चढवल्याने आता युद्धाची तीव्रता वाढली आहे. त्यातच आता इराणने मोठा दावा केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भवितव्य अंधारात आहे. इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यामुळे नेतान्याहू यांचे भवितव्य अंधारात असल्याचे इराणने म्हटले आहे.

इराणची वृत्तसंस्था आयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नेतन्याहू यांच्या कार्यालयाला आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या ठिकाणाला अचानक हल्ला करण्यात आला. इराण टाईम्सच्या मते हल्ल्यानंतर नेतान्याहू यांचे भवितव्य अंधारात असल्याचा दावा आयआरजीसीने केला आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

या युद्धात आता इराणही सर्वशक्तीनिशी उतरल्याचे दिसत आहे. सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर इराणने भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून अरामकोने आपली अत्यंत महत्त्वाची असलेली ‘रास तनुरा’ रिफायनरी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. इराणशी सुरू असलेल्या युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की इराणशी सुरू असलेले युद्ध पुढील चार आठवडे सुरू राहू शकते. आमचा असा अंदाज आहे की, हे युद्ध किमान चार आठवडे सुरू राहू शकते. मात्र, त्याआधीच हा संघर्ष संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्यची शक्यता आहे. त्यातच आता इराणच्या वृत्तसंस्थेने मोठा दावा केला आहे.

Comments are closed.