नोकरीच्या शोधात आलेलो आता जीव वाचवण्यासाठी बंकर शोधतोय, दुबईत अडकलेल्या हिंदुस्थानीची मदतीसाठी याचना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला असून त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. इराणने देखील या दोघांना चोख प्रत्युत्तर देत आखाती देशातील अमेरिकेच्या तळांना व कार्यालयांना लक्ष्य केले आहे. दोन्ही देशांसहीत आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असून इतर देशांमधील अनेक पर्यटक, विद्यार्थी, नागरिक तिथे अडकले आहेत.

आखाती देशांमध्ये तब्बल 9 दशलक्ष हिंदुस्थानी कामासाठी गेलेले आहेत. या अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारांबाबत सांगितले आहे.

एका तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो की, ”मी इथे नोकरीच्या शोधात आलो होतो. आता मला बॉम्ब हल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकर शोधावे लागत आहेत. हिंदुस्थान सरकारने मला लवकरात लवकर इथून बाहेर काढावे”. दुसऱ्या एका तरुणाने सोशल मीडियावर रील शेअर करत सांगितले की, ”सध्या मी तेहरानला आहे. इथे मिसाईल्सचा पाऊस पडतोय. काय घडतंय काही कळत नाहीये. माझ्यासोबत हिंदुस्थानातील अनेक विद्यार्थी आहेत. आमची हिंदुस्थान सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला इथून बाहेर काढावे”.

Comments are closed.