आक्रमक खेळाडूकडे कर्णधारपद द्या, पाकच्या कामगिरीवर आफ्रिदी नाराज, नवं नाव सुचवलं
नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला होणार आहे.तर, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला उपांत्य फेरीतील पहिली लढत होणार आहे. सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानचं आव्हान संपलं. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या टी 20 कर्णधाराच्या बदलाच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी यानं शादाब खानवर टीका केली आहे. तर, कर्णधार म्हणून आक्रमक खेळाडूची गरज असल्याचं म्हटलंय. यासाठी आफ्रिदीनं फखर झमानच्या नावाला पसंती दर्शवली आहे.
सलग चौथ्यांदा आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचण्यात पाकिस्तानला अपयश आलं आहे. त्यामुळं कर्णधार सलमान अली आगा याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. पाकिस्तानी माध्यमात शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, शाहिद आफ्रिदीनं समा टीव्हीवर बोलताना पाकिस्तानच्या कामगिरीवर सडकून टीका केली.
शाहिद आफ्रिदीनं शादाब खानकडे नेतृत्व सोपवणं हे काही उत्तर नसल्याचं म्हटलं. शादाब खानची कामगिरी पाहता तो त्याला संघाचं नेतृत्व करता येणार नाही असंही आफ्रिदी म्हणाला.
शादाब खान यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 118 धावा केल्या आणि सात विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीमुळं तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. माईक हेस्सोन कोच असल्यानं शादाब खान कॅप्टन होऊ शकतो, असं वाटत असल्याचं शाहिद आफ्रिदी म्हणाला. मात्र, शादाब खानची सध्याची कामगिरी पाहता त्याला टीममध्ये जागा देखील मिळाली नाही पाहिजे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.
पाकिस्तानच्या नेतृत्त्वासंदर्भातील अस्थिरता यामळं संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो. सलमान अली आगा टी 20 टीमचा 12 महिन्यातील चौथा कर्णधार आहे.त्यानं कॅप्टन म्हणून पहिल्या वर्ल्ड कपमध्ये केव 60 धावा केल्या आहेत. यामुळं शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तानला आक्रमक नेतृत्त्वाची गरज आहे. यासाठी आफ्रिदीनं सलामीवीर फखर झमानला कर्णधार करावं असं म्हटलं आहे.
शाहिद आफ्रिदीनं सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानच्या सध्याच्या टी 20 क्रिकेट संघाचं नेतृत्व फखर झमानला कर्णधार करावं, असं सुचवलं आहे.
दरम्यान, पाकिस्ताननं सुरुवातीला भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीनं समजूत काढल्यानंतर ते मॅच खेळण्यास तयार झाले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.