T20 WC26: सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीची मोठी घोषणा, अंपायर आणि मॅच रेफरी ठरले

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आता पुढील दोन दिवसात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (२ मार्च) मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी पंच आणि मॅच रेफऱींची नावे घोषित केली आहेत.

आयसीसीच्या माहितीनुसार, कोलकाता आणि मुंबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी अनुभवी पंचांची निवड केली आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड समोरा-समोर येणार आहेत. हा सामना ४ मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑन-फिल्ड अंपायर म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ आणि ऍलेक्स व्हार्फ, नितीन मेनन (थर्ड अंपायर), रॉड टकर (फोर्थ अंपायर) आणि जवागल श्रीनाथ हे मॅच रेफरी असणार आहेत.

मुंबईमध्ये ५ मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी ऑन फिल्ड अंपायर म्हणून क्रिस गॅफनी आणि अल्लाउद्दीन पलेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये ऍड्रियन होल्डस्टोक (थर्ड अंपायर), पॉल रिफेल (फोर्थ अंपायर) आणि ऍंडी पेक्रॉफ्ट (मॅच रेफरी) यांचाही समावेश आहे.

उपांत्य फेरी – 1 कोलकाता, बुधवार, 4 मार्च,
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड
रिचर्ड इलिंगवर्थ आणि ऍलेक्स व्हार्फ – ऑन-फिल्ड
नितीन मेनन – थर्ड अंपायर
रॉड टकर – चौथा अंपायर
जवागल श्रीनाथ – सामनाधिकारी

उपांत्य फेरी – २ मुंबई, गुरुवार ५ मार्च २०२६
भारत विरुद्ध इंग्लंड
क्रिस गॅफनी आणि अल्लाहुद्दीन पालेकर – ऑन-फिल्ड
एड्रियन होल्डस्टॉक – तिसरा पंच
पॉल रीफेल – चौथा अंपायर
ऍंडी पायक्रॉफ्ट – मॅच रेफरी

Comments are closed.