आयपीएल 2026 स्पर्धेचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? बीसीसीआय 2 टप्प्यांत स्पर्धा का घेतेय? जाणून घ्या सविस्तर

आयपीएल 2026 स्पर्धेची (Indian premiere league 2026) आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धा सुरू व्हायला महिनाभरापेक्षा कमी काळ उरला असताना, आता बीसीसीआय (BCCI) लवकरच वेळापत्रक जाहीर करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएल गवर्निंग कौन्सिलने यावर्षीची स्पर्धा दोन टप्प्यांत (Phases) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, 6 किंवा 7 मार्चला पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. तसेच सूत्रांनुसार, आयपीएल 2026 स्पर्धेला सुरुवात 28 मार्च पासून होऊ शकते.
पहिल्या टप्प्यात फक्त सुरुवातीच्या 13 ते 14 दिवसांच्या सामन्यांचे वेळापत्रक असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांची घोषणा केली जाईल. लवकरच परदेशी खेळाडूंना त्यांच्या बोर्डाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे स्पर्धेची तयारी अधिक वेगवान होईल.
चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की हे वेळापत्रक दोन भागांत का येत आहे? तर, यावर्षी पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या तिन्ही राज्यांत आयपीएलचे सामने होणार असल्याने, निवडणुकांच्या तारखा आणि सामन्यांच्या वेळा एकमेकांशी आडव्या येऊ नयेत, यासाठी बोर्ड खबरदारी घेत आहे. सध्या बीसीसीआयचे बहुतांश अधिकारी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या आयोजनात व्यस्त आहेत, ज्याचे आता फक्त उपांत्य आणि अंतिम सामने बाकी आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच बीसीसीआय दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करेल, जेणेकरून नंतर सामन्यांच्या तारखा बदलण्याची वेळ येऊ नये.
Comments are closed.