टी20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! निवडकर्त्याचा राजीनामा, बाबर आझमबाबत केला मोठा गौप्यस्फोट

पाकिस्तान क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. विशेषतः आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये टीमला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
संघाचे माजी अंपायर आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचे निवडकर्ता (Selector) अलीम डार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला फक्त श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवता आला. भारत आणि इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. या खराब प्रदर्शनामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
रिपोर्ट्सनुसार, अलीम डार (Alim Dar) यांना निवड समितीत मोकळेपणाने काम करता येत नव्हते. मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांचा वाढता हस्तक्षेप आणि प्रभाव यामुळे डार नाराज होते. अलीम डार यांच्यासोबतच आकिब जावेद, अझहर अली आणि अॅनालिस्ट हसन चीमा हे देखील निवड समितीत होते. डार यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रशिक्षक माइक हेसन यांच्या अडचणीतही वाढ होऊ शकते. राजीनामा देताना अलीम डार (Alim Dar on Babar Azam) यांनी कर्णधार बाबर आझमबाबत काही मोठे खुलासे केल्याचेही समोर येत आहे.
वर्ल्ड कपमधील पराभवाचा ठपका ठेवत आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलांना सुरुवात झाली असून, अंतर्गत वादांमुळे निवडकर्त्यांनी पद सोडण्यास सुरुवात केली आहे.
Comments are closed.