IND vs ENG: सेमीफायनलपूर्वी सॅम करनचा ‘माइंड गेम’! पॅट कमिन्सप्रमाणेच भारतीय चाहत्यांना शांत करण्याचा दिला इशारा

भारत आणि इंग्लंड (India vs England) हे दोन दिग्गज संघ 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य (सेमीफायनल) सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. या मोठ्या लढतीपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने (Sam curren) आपला आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

आम्ही एकमेकांविरुद्ध आणि या मैदानावर इतके क्रिकेट खेळलो आहोत की, आता कोणापासून काहीही लपलेले नाही. तसेच आम्ही भारतीय खेळाडूंसोबत आयपीएलमध्ये खूप खेळतो, त्यामुळे आम्हाला इथल्या वातावरणाची सवय झाली आहे.

वानखेडेवर भारतीय समर्थकांचा मोठा आवाज असेल, पण गुरुवारी रात्री हे स्टेडियम शांत असेल याची मला खात्री आहे. भारतीय संघ नक्कीच शानदार आहे, पण आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आमच्या मागील कामगिरीने आता काही फरक पडत नाही; हा वर्ल्ड कप सेमीफायनल आहे आणि आम्ही आमचा ‘परफेक्ट’ खेळ खेळू.

2022 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला 10 विकेट्सनी हरवून जेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर 2024 मध्ये भारताने इंग्लंडला 78 धावांनी हरवून त्या पराभवाचा बदला घेतला आणि विश्वचषक जिंकला होता.

भारत विरुद्ध इंग्लंड संघामध्ये एकूण 29 टी-20 सामने खेळले गेले आहेत त्यामध्ये17 भारतीय संघाने तर 12 इंग्लंडने जिंकले आहेत. याचबरोबर टी20 बद्दल बोलायचे झाल्यास, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघात 5 सामने खेळले गेले आहेत ज्यात 3 भारताने तर 2 इंग्लंड संघाने जिंकले आहेत.

सेमी फायनल सामन्यात वानखेडे वर आता कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.