बुमराह रचणार इतिहास! एका विकेटसह सामील होणार जगातील महान गोलंदाजांच्या यादीत

भारत आणि इंग्लंड यांच्यात (५ मार्च) रोजी टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य (सेमीफायनल) सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात इंग्लंडला नमवून विजेतेपदाच्या लढतीत (फायनलमध्ये) जागा मिळवण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘५००’ बळींचा (विकेट्स) टप्पा ओलांडण्याची सुवर्णसंधी असेल. बुमराहने २०१६ पासून आतापर्यंत २३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०.६ च्या सरासरीने ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, जुलै २०२२ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध १९ धावा देऊन ६ बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.
जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२ सामन्यांच्या ९९ डावांत २३४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ८९ एकदिवसीय (वनडे) सामन्यांमध्ये या उजव्या हाताच्या गोलंदाजाने १४९ बळी टिपले आहेत. ९३ टी-२० सामन्यांमध्ये बुमराहने आतापर्यंत ११६ विकेट्स मिळवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२० मिळून) ५०० विकेट्सचा टप्पा गाठणारे आतापर्यंत 7 भारतीय गोलंदाज झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत. त्यांनी १९९० ते २००८ दरम्यान ४०३ सामन्यांत ३०.०९ च्या सरासरीने ९५६ विकेट्स घेतल्या. तर, रविचंद्रन अश्विनने २०१० ते २०२४ दरम्यान २८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २५.८ च्या सरासरीने ७६५ बळी मिळवले आहेत.
च्याहरभजन सिंगने १९९८ ते २०१६ दरम्यान एकूण ३६७ सामने खेळले, ज्यात त्याने ७११ विकेट्स घेतल्या. तर कपिल देव यांनी १९७८ ते १९९४ दरम्यान ३५६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६८७ बळी मिळवले. कपिल देव यांच्याच नेतृत्वाखाली भारताने १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
च्यारवींद्र जडेजाने २००९ पासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ३७३ सामन्यांत ६३४ विकेट्स घेतल्या आहेत, तर झहीर खानने २००० ते २०१४ दरम्यान ३०९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६१० बळी मिळवले. जवागल श्रीनाथ यांनी १९९१ ते २००३ या काळात २९६ सामन्यांत ५५१ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
Comments are closed.