मुंबईत सफाई कामगारांच्या घरकुल, योजनेला अखेर बीपीटीची मंजुरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या दक्षिण मुंबईतील वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅलार्ड इस्टेट येथील कोचीन मार्गावरील वसाहतीच्या पुनर्विकासास मुंबई पोर्ट ट्रस्टने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

सफाई कामगारांसाठी आश्रय योजना राबविण्यात येत आहे. कोचीन स्ट्रीट येथील प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीअभावी रखडला होता. मुंबई बंदर प्राधिकरणाने या गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या परवानगीसाठी पालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोर्ट ट्रस्टला पत्र पाठवले होते.

भूमिपूजनानंतर वर्षभराने मंजुरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते, मात्र प्रशासकीय अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडला होता.

  • फोर्टमधील कोचीन स्ट्रीट येथे उभारण्यात येणाऱया या प्रकल्पात 238 चौरस फुटांची 54 घरे बांधण्यात येणार आहेत.
  • आश्रय योजनेअंतर्गत मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या 36 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
  • घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱयांसाठी या योजनेत सुमारे 12 हजार सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
  • प्रस्तावित बहुमजली इमारती उद्यान, मनोरंजन केंद्र यासह आधुनिक सुविधांयुक्त दर्जेदार स्वरूपाच्या असतील.

Comments are closed.