‘अरे यांना आधी हाकलून लावा….’, पाकिस्तानी खेळाडूंवर आफ्रिदीचा संताप

भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ५ मार्च रोजी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु यावेळी पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. उपांत्य फेरीत पोहोचू न शकलेल्या पाकिस्तानी संघावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. खेळाडूंना ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड केवळ अनुशासनहीनतेसाठीच नाही तर त्यांच्या खराब कामगिरीसाठीही लावण्यात आला आहे.

टी२० विश्वचषक गट सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला, ज्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी खेळाडूंवर मोठा संताप व्यक्त केला आहे. त्याने 50 लाख रुपयांचा दंड खूपच कमी आहे. आणखी जास्त दंड लावायला हवा होता, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले. तसेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंना थेट दोन-दोन वर्षांसाठी घरी बसवायला हवे. त्यांना संघात स्थान द्यायला नको, असेही आफ्रिदी म्हणाला.

विशेष म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आफ्रिदीच्या या मताचा विचार करेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. टी-२० विश्वचषकात अशा भेदभावपूर्ण कृतीमुळे संघात सुधारणा करण्याची वेळ आली आहे आणि भविष्यातील सामन्यांसाठी संघावर दबाव येऊ शकतो.

सर्वांना हे स्पष्ट आहे की आता पाकिस्तानने संघाची पुनर्रचना करण्याची, कामगिरी सुधारण्याची आणि तरुण खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. आफ्रिदीचा सल्ला आणि कडक इशारा संघाच्या भविष्यातील रणनीतीसाठी निर्णायक ठरेल.

Comments are closed.