Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावर

Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाकडून 293 च्या प्रस्तावावर चर्चा करत असताना दावोस दौऱ्यादरम्यान झालेल्या करारासंदर्भात आज आदित्य ठाकरेंपासून अनेक विरोधी पक्षाचे आमदार बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक उद्योजक जाऊन परदेशात करार करतात. या संदर्भात विरोधक जोरदार आरोप करतील. सोबतच अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालेलं आहे. यावरती लक्षवेधी रोहित पाटील मांडणार आहेत.

Comments are closed.