खारवा प्रीमियर लीगमध्ये मोरया बॉईजची बाजी
खारवा प्रीमियर लीगच्या सातव्या पर्वात मोरया बॉईज या संघाने बाजी मारली. अत्यंत दिमाखात इस्लाम जिमखाना येथे ही स्पर्धा पार पडली. चॅलेंजर इलेव्हन विरुद्ध मोरया बॉईज यांच्यात झालेल्या लढतीत मोरया बॉईजने बाजी मारत खारवा प्रीमियर लीगवर आपले नाव कोरले. मोरया स्पोर्ट्स क्लब आयोजित व युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ पुरस्कृत खारवा प्रीमियर लीगमध्ये यंदा एकूण 18 संघ सहभागी झाले होते.
यावेळी कुलाबा विधानसभा प्रमुख पल्लवी सकपाळ, शाखा संघटक माधुरी पेंढारी, उपविभाग अधिकारी मिलिंद झोरे, सुबोध ज्वेलर्सचे अशोक भाई, मुंबई खारवा समाज अध्यक्ष विठ्ठल बैराई, सचिन भद्रीचा, चेतन गोसिया, लक्ष्मीदास वंदूर, अभिषेक गोहिल, गिरीश धालकिया उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोरया स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.