इंस्टाग्रामवर रोज अश्लिल मेसेज पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नसून…. आयेशा खान नेमकं काय म्हणाली
‘धुरंधर’ फेम अभिनेत्री आयेशा खानने ऑनलाइन ट्रोलिंग आणि तिला आलेल्या भयानक अनुभवाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. धुरंधर या चित्रपटातील शरारत या गाण्यानंतर आयेशा एका रात्रीत स्टार झाली. देशासह परदेशातही आयेशाचा चाहता वर्ग निर्माण झाला. नुकतेच आयेशाने मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. याअंतर्गत तिने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न कसा झाला होता याबाबतही मौन सोडले.
बलात्काराच्या घटनेची आठवण करून देताना आयेशा भावुक झाली आणि म्हणाली, “कधीकधी या ऑनलाइन कमेंट्स जुन्या जखमा पुन्हा नव्याने आयुष्यात डोकावतात. आयेशा म्हणाली की, तिला नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी ट्रोल केले जाते. ‘धुरंधर’ मधील “शरारत” गाण्याच्या शूटिंग दरम्यान मी मासिक पाळी सुरू असल्याचे सांगितले तेव्हा मला ट्रोल करण्यात आले होते. “सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी मला शंभर वेळा विचार करावा लागतो. इतरांच्या घाणेरड्या विचारांमुळे मला माझ्या निवडींवर नियंत्रण ठेवावे लागते हे खूप दुःखद आहे.”
बलात्काराच्या धमक्या मिळतात का याविषयी देखील तिने मनमोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, हो, दररोज! मी आत्ताच माझा फोन उघडून दाखवु शकते. दुःखाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या धमक्या आता सामान्य झाल्या आहेत. धमक्या देणारे हे लोक, ट्रोल करणारे, रोबोट नाहीत तर आपल्या आजूबाजूला राहणारी माणसं आहेत.
आयशाने अजून एक अनुभव सांगितला. ती म्हणाली, ती एकदा तिच्या वडिलांसोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. चित्रीकरणादरम्यान तिला तिच्या इंस्टाग्रामवर जवळजवळ दररोज अश्लील व्हॉइस नोट्स आणि मेसेज येत असत. एके दिवशी तिला कळले की, हे व्हॉइस नोट्स आणि मेसेज पाठवणारा कोणी अनोळखी नाही तर तिच्या सेटवर काम करणारा एक स्पॉट बॉय आहे. तिने ताबडतोब प्रॉडक्शन आणि तिच्या वडिलांना कळवले आणि त्या मुलाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
Comments are closed.