वेस्ट इंडिजविरुद्धची भन्नाट खेळी अन् संजू सॅमसनची टी20 क्रमवारीत मोठी झेप, पोहोचला थेट ‘या’ स्थानावर

क्रिकेटविश्वात सध्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा थरार सुरू आहे. यामध्ये आजपासून (४ मार्च) उपांत्य फेरीचे सामने खेळले जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात उल्लेखनीय खेळी केली. त्याने १९६ धावसंख्येचा पाठलाग करताना नाबाद ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीने भारत उपांत्य फेरीत पोहोचला आणि त्याने आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली.
आज (४ मार्च) आयसीसीने पुरुष टी२० क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम असून संजूने २५ स्थानांची झेप घेतली आहे. यामुळे संजू आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत ४०व्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत भारताचे अभिषेकसोबत ईशान किशन (चौथ्या स्थानावर), तिलक वर्मा (सहाव्या) आणि कर्णदार सूर्यकुमार यादव (सातव्या स्थानावर) यांचा समावेश आहे.
आयसीसीने पुरुष टी२० क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या स्थानावर आला असून त्याच्यात आणि अभिषेकमध्ये केवळ २६ पॉइंट्सचा फरक आहे. फरहानने या टी२० विश्वचषकात दोन शतकी खेळी केल्या होत्या. दुसरीकडे अभिषेक धावा करण्यात अपयशी होत आहे. त्याची अशीच कामगिरी सुरू राहिली तर लवकरच फरहान अव्वल स्थानावर येईल.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.