प्रियांका चोप्राने अमेरिकेत साजरी केली होळी, पती निक जोनाससोबत सेलिब्रेशनची झलक केली शेअर – Tezzbuzz
रंगपंचमी आणि धुळवड हा सण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. तर अनेक सेलिब्रिटी ही हा सण उत्साहात साजरा करत आहेत. आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे अशातच आता गायक-अभिनेता निक जोनासने त्याची पत्नी प्रियांका चोप्रासोबतचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर आहे.गायकाने बुधवारी सकाळी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला, जो त्याने त्याच्या आवडत्या होळीच्या क्षणांपैकी एक आहे असे म्हणले.
या शेअर केलेल्या फोटोमध्ये, निक (nick)आणि प्रियांका दोघेही गुलालात बुडालेले दिसत आहेत. गुलाबी पारंपारिक पोशाखात असलेली प्रियांका हसत आणि निकच्या गळ्यात हात घालताना दिसत आहे. निकने फोटोला कॅप्शन दिले आहे, “माझ्या आवडत्या होळीच्या आठवणींपैकी एक छोटासा थ्रोबॅक फोटो. सर्वांना होळीच्या शुभेच्छा.” निक आणि प्रियांकाने 2018 मध्ये ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही परंपरांनुसार लग्न केले आणि नेहमीच एकमेकांच्या परंपरांचा आदर केला आहे. दिवाळी असो, ख्रिसमस असो किंवा होळी असो, हे जोडपे त्यांचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. दरम्यान, प्रियांका तिच्या अलिकडच्या “द ब्लफ” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रियांका कार्ल अर्बनच्या विरुद्ध तलवारबाजी आणि बंदुकीच्या लढाईच्या दृश्यांमध्ये दिसणार आहे. “द ब्लफ” 25 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
प्रियांकाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेला “द स्काय इज पिंक” होता. प्रियांकासोबत फरहान अख्तरने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाला चांगली कामगिरी करता आली नाही. तेव्हापासून प्रियांकाने अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आता, आठ वर्षांनंतर, आता प्रियांका एसएस राजामौली यांच्या वाराणसी चित्रपटात मंदाकिनीची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
धुरंदर 2च्या बॉक्स ऑफिस टक्करची भीती? टॉक्सिसच्या मेकर्सनी रिलीज डेट महिन्याभर ढकली पुढे
Comments are closed.