संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक श
ICC T20 रँकिंग अपडेट मराठी बातम्या : आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून जागतिक क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. यावेळी सर्वात मोठा धमाका केला तो केरळच्या धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन याने. आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर संजूने थेट 25 स्थानांची मोठी झेप घेत टॉप-40 फलंदाजांमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या त्याच्या ऐतिहासिक नाबाद 97 धावांच्या खेळीमुळे त्याला हा फायदा मिळाला. शतकापासून अवघ्या 3 धावा दूर राहूनही संजूने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रमवारीचे सगळे समीकरणच बदलून टाकले.
कर्णधार सूर्याची घसरण, ईशान-तिलकची भरारी
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे संघातील इतर युवा खेळाडूंचीही क्रमवारीत जोरदार प्रगती झाली आहे. इशान किशन याने आपल्या सातत्यपूर्ण फॉर्मच्या जोरावर एक स्थानाची सुधारणा करत जगातील चौथ्या क्रमांकाचा टी-20 फलंदाज म्हणून स्थान पक्के केले आहे. तसंच, तिलक वर्मा यानेही एक पायरी वर चढत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र, भारतीय चाहत्यांना थोडासा धक्का देणारी बातमी म्हणजे टी-20 क्रिकेटचा बादशाह समजला जाणारा सूर्यकुमार यादव एक स्थान घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याची घसरण चर्चेचा विषय ठरली आहे.
नंबर वनच्या गादीसाठी थरारक लढत
सर्वात रोमांचक शर्यत नंबर एकच्या खुर्चीसाठी रंगली आहे. भारतीय युवा सनसनी अभिषेक शर्मा सध्या जगातील अव्वल टी20 फलंदाज आहे. मात्र त्याच्या सिंहासनाला आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज साहिबजादा फरहान जबरदस्त धावा करत अभिषेकच्या अगदी जवळ दुसऱ्या स्थानावर येऊन ठेपला आहे. दोघांमधील गुणांचे अंतर अत्यंत कमी असल्याने नंबर वनची खुर्ची कधीही बदलू शकते.
आयसीसी टी-20 फलंदाज क्रमवारी (Top 10 Rankings)
भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या या क्रमवारीत अव्वल स्थानी असून, टॉप 10 मध्ये भारताच्या एकूण 4 खेळाडूंनी आपले स्थान पक्के केले आहे.
| देश | खेळाडू | रेटिंग गुण |
| भारत | अभिषेक शर्मा | ८७४ |
| पाकिस्तान | साहिबजादा फरहान | ८४८ |
| इंग्लंड | फिल सॉल्ट | 803 |
| भारत | ईशान किशन | ७८३ |
| श्रीलंका | पाथुम निसांका | ७६६ |
| भारत | टिळक वर्मा | ७४९ |
| भारत | सूर्यकुमार यादव | ७३९ |
| दक्षिण आफ्रिका | dewald brevis | ७३७ |
| इंग्लंड | jos बटलर | ७१६ |
| न्यूझीलंड | टिम सेफर्ट |
७१२ |
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.