IND vs ENG: सेमीफायनलमध्ये इंडियासाठी हा खेळाडू ठरणार ‘गेम चेंजर’! मोहम्मद कैफने वानखेडेच्या खेळपट्टीबाबत दिला मोठा इशारा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs Newzealand) यांच्यापैकी एक संघ फायनलचे तिकीट मिळवेल. तर, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. 5 मार्च रोजी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohmmed kaif on Jasprit Bumrah) एक मोठे विधान केले असून, जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्ध सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे म्हटले आहे.

कैफच्या मते, सेमीफायनलमध्ये बुमराहची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह हा सर्वात मोठा फॅक्टर असेल. त्याचे चार ओव्हर्स सामन्याचा निकाल ठरवू शकतात. आकडेवारीही बुमराहच्या बाजूने आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 9.11 आणि इकॉनॉमी 5.34 राहिली आहे, जी त्याची ताकद दर्शवते.

मोहम्मद कैफने सामन्यापूर्वी वानखेडेच्या खेळपट्टीबद्दलही एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्याच्या मते, येथे टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याची पारंपारिक पद्धत आता बदलू शकते, कारण दुसऱ्या डावात दव (Dew) पडण्याचा प्रभाव कमी असू शकतो.

तो म्हणाला की, ही एक वेगळी खेळपट्टी आहे. वानखेडेचे स्वरूप थोडे बदलले आहे. सहसा लोकांना वाटते की वानखेडेवर टॉस जिंकल्यावर आधी गोलंदाजी करावी, कारण फ्लडलाईट्समध्ये दव पडल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे जाते. पण ही खेळपट्टी ईडन गार्डन्सपेक्षा खूप वेगळी आहे. ईडन गार्डन्सवर आपण पाहिले की दव पडल्यामुळे फलंदाजी करणे सोपे झाले होते, पण वानखेडेवर तसे होईलच असे नाही. अलीकडच्या काही सामन्यांत आपण पाहिले आहे की, इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 180 धावांचा पाठलाग करताना अडखळला होता.

Comments are closed.