ह्रदयद्रावक… वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
सिंधुदुर्ग : राज्यात होळी आणि धुळवडीच्या (Holi) सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. मात्र, काही ठिकाणी दुर्घटना घडल्याने सणाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. भंडारा आणि गोंदियात तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तर, अपघाताच्या घटनेतही दोन ठार झाल्याचं दिसून आलं. तर, सिंधुदुर्गातील कणकवलीतही होळीच्या सणादिवशीच बहीण-भावाच्या कारचा भीषण अपघात (Accident) होऊन बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर, भावाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कणकवली तालुक्यातील खारेपाटण मधील पुरुषोत्तम शेट्ये यांच्या कुटुंबीयांवर होळीच्या सणादिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. ऋतुपर्ण शेट्ये आणि तनिषा शेट्ये यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये, तनिषा शेट्ये जागीच ठार झाली असून तिचा भाऊ ऋतुपर्ण शेट्ये हा गंभीर जखमी झाला आहे. तळेरे येथून वडिलांना घेऊन येण्यासाठी त्यांचा मुलगा ऋतुपर्ण शेट्ये आणि मुलगी तनिषा शेट्ये दोघेही जुन्या मॉडेलची ॲम्बेसिडर कार घेऊन तरळेच्या दिशेने निघाले होते. मात्र, नडगीवे येथील धुरीभाटालेवाडी बस थांब्याजवळ येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये, अॅम्बेसिडर कारचा चेंदामेंदा झाल्याने अपघातात कारमधील तनिषा ही जागीच ठार झाली.
लातूरमध्येही भीषण अपघात, महिलेचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरात 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता महात्मा फुले चौकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उदगीर येथे हलविण्यात आले आहे. कार चालक किरकोळ जखमी झाला. धर्माबादहून हरभरा घेऊन येणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. नांदेडहून डोनगावकडे अंत्यविधीसाठी जाणारी कार ट्रकवर आदळल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे ट्रक चालक अक्रम शेख यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
हेही वाचा
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
आणखी वाचा
Comments are closed.