फिन अ‍ॅलेनने ठोकले टी-20 विश्वचषकातील सर्वात जलद शतक; ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला

बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावून न्यूझीलंडचा स्टार फलंदाज फिन अ‍ॅलेनने इतिहास रचला. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर त्याने फक्त ३३ चेंडूत शतक झळकावले, ज्यामुळे तो न्यूझीलंडसाठी टी-२० विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. न्यूझीलंडने हा सामना नऊ विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.

या सामन्यात फिन अ‍ॅलेनने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचा १० वर्षे जुना विक्रम मोडला. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात गेलने इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत शतक झळकावले होते. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेलने ५० चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय, २०१२ मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने बांगलादेशविरुद्ध ५१ चेंडूत शतक झळकावले होते, तर हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध ५१ चेंडूत शतक झळकावले होते.

फिन अ‍ॅलेनने केवळ सर्वात जलद शतकच झळकावले नाही, तर टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक धावाही झळकावल्या. त्याने ३३ चेंडूत नाबाद १०० धावा करून हा विक्रम केला. याआधीचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता, ज्याने नाबाद ९६ धावा केल्या होत्या. तसेच, भारताचा माजी फलंदाज विराट कोहलीने नॉकआउट सामन्यात नाबाद ८९ धावा केल्या होत्या.

या ऐतिहासिक कामगिरीसह, फिन अ‍ॅलेनने टी२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन विक्रम केले आहेत, सर्वात जलद शतक आणि नॉकआउटमध्ये सर्वाधिक धावा. त्याच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडला दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

Comments are closed.