पुरुषांच्या T20 विश्वचषकाने प्रेक्षकसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला

500 दशलक्षहून अधिक प्रेक्षकसंख्या

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी भारतात सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या विक्रमी प्रेक्षकसंख्येवर प्रकाश टाकला. जो 500 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. आजवरच्या कोणत्याही टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ही विक्रमी प्रेक्षकसंख्या आहे. जह शाह यांनी असेही नमूद केले की, जिओ हॉटस्टारवर एकाच वेळी प्रेक्षकसंख्या 60.5 दशलक्ष झाली आहे. स्पर्धेचा नॉकआऊट टप्पा सुरु होताच, चाहत्यांचा मजबूत पाठिंबा मिळून नवा विक्रम प्रस्थापित केला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

एक्सवरील एका पोस्टमध्ये जय शाह म्हणाले, टी-20 वर्ल्डकप 2026 चा प्रवास हा आतापर्यंतचा सर्वात जागतिक आणि सुलभ क्रिकेट स्पर्धा बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेने सुरू झाला. भारतातील या स्पर्धेची प्रेक्षकसंख्या 500 दशलक्ष ओलांडली आहे हे पाहून मला आनंद झाला असून इतिहासातील कोणत्याही टी-20 विश्वचषकासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. जिओ हॉस्टारने एकाच वेळी 60.5 दशलक्ष प्रेक्षकांचा उच्चांक गाठला हे पाहूनही आनंद झाला. आता नॉकआऊट सामने सुरू असल्याने आम्हाला आशा आहे की भारतीय चाहत्यांकडून आमच्या स्पर्धेला मिळणारे अफाट प्रेम अधिक विक्रम मोडण्यास मदत करेल. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होईल.

Comments are closed.