वृद्धाची फसवणूक करणाऱ्याला अटक
दहशतवाद्यांसाठी बँकेत खाते उघडून कमिशन दिल्याचे भासवून वृद्धाची फसवणूक करणाऱयाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. किशन मकवाना असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार यांना त्याच्या आधारकार्डवरून जम्मू-कश्मीर येथील एका बँकेत खाते उघडल्याचे ठगाने फोन करून सांगितले. खात्यात जमा झालेली रक्कम दहशतवाद्यांची असल्यामुळे या प्रकरणात अटकेची भीती दाखवून सवा दोन कोटी उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली.
Comments are closed.