नातवाने अंगावर रंग उडवला म्हणून आजीने ओतले उकळते पाणी, नागपुरातील घटनेचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ व्हायरल
नागपूर जिल्ह्यातील कोराडी गावामध्ये होळीच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. खेळताना अंगावर रंग उडवला या रागातून आजीने आपल्या 4 वर्षांच्या नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतले. ही घटना 3 मार्च रोजी कोराडीतील आदर्शनगरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भागात घडली. हा संतापजनक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Comments are closed.