१५ लाखांहून अधिक युजर्सनी ChatGPT चा वापर थांबवला? पेंटागन सोबतच्या करारामुळे OpenAI ला फटका
AI ची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत असून आता टेक कंपन्यांनी याकडे आपला मोर्चा वळवला आहे. अधिकाधिक ग्राहक मिळवण्याची स्पर्धा या टेक कंपन्यांमध्ये लागली आहे. आपल्याकडील तंत्रज्ञान सगळ्यांपेक्षा वेगवान, आधुनिक आणि अचूक असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशातच ओपन एआय हा सॅम ऑल्टमॅन यांच्या कंपनीला सरकारच्या संरक्षण विभागाशी केलेल्या कराराचा फटका बसल्याची चर्चा आहे. तर अमेरिकी सरकारला अनिर्बंध प्रवेशास नकार देणाऱ्या अँथ्रोपिक कंपनीचं मात्र युजर्स कौतुक करत असल्याचं दिसत आहे.
ओपनएआयची प्रतिस्पर्धी कंपनी ‘अँथ्रोपिक’ने (Anthropic) आपल्या मॉडेल्सचा अशाप्रकारे अनिर्बंध प्रवेश अमेरिकन सरकारला देण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या या भूमिकेचे युजर्सकडून कौतुक होत असून, अनेक जण आता चॅटजीपीटी सोडून अँथ्रोपिकच्या ‘क्लाउड’ (Claude) चॅटबॉटचा वापर करू लागले आहेत.
सॅम ऑल्टमॅन यांच्या नेतृत्वाखालील ‘ओपनएआय’ (OpenAI) कंपनीला सध्या जगभरातील युजर्सच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (Pentagon) त्यांचे ‘एआय मॉडेल्स’ एका गुप्त सरकारी नेटवर्कवर वापरण्याची परवानगी दिल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. ‘फोर्ब्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बहिष्कार मोहिमेवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाइटने दावा केला आहे की, या घोषणेनंतर अवघ्या ४८ तासांत १५ लाखांहून अधिक युजर्सनी ‘चॅटजीपीटी’चा (ChatGPT) वापर थांबवला आहे.
पेंटागॉनसोबतच्या करारामुळे संतापाची लाट
ओपनई पेंटागॉन डीलनंतर 1.5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते chatgpt सोडतात: अहवाल
sam altman led openai ला मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांच्या निर्गमनाचा सामना करावा लागत आहे कारण 1.5 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स सोबतच्या करारानंतर chatgpt सोडतात. मानववंशीय क्लॉड लोकप्रियता मिळवते.
ओपनएआयने अलीकडेच पेंटागॉनसोबत त्यांच्या एआय तंत्रज्ञानाचा सुरक्षित यंत्रणांमध्ये वापर करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयावर ऑनलाइन माध्यमातून कडाडून टीका होत असून, काही युजर्सनी कंपनीवर लष्करी कारवायांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे.
बहिष्कार मोहिमेच्या वेबसाइटनुसार, ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) सोबतचे करार, ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी ‘MAGA Inc’ ला दिलेली २५ दशलक्ष डॉलर्सची कथित देणगी आणि आता पेंटागॉनसोबत झालेला नवा करार यामुळे युजर्सनी सबस्क्रिप्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अँथ्रोपिकच्या ‘क्लाउड’ला वाढती पसंती
गेल्या आठवड्यात अँथ्रोपिकच्या ‘क्लाउड’ ॲपने ॲप स्टोअरच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत चॅटजीपीटीला मागे टाकले आहे. दरम्यान, ओपनएआयने अद्याप सबस्क्रिप्शन रद्द करणाऱ्या युजर्सच्या अधिकृत आकड्याबाबत कोणतेही जाहीर विधान केलेले नाही.
डेटा डिलीट करण्याचे पर्याय
युजर्सना आपला डेटा एक्सपोर्ट करण्याचा पर्याय आहे, मात्र ही प्रक्रिया त्वरित होत नाही. युजर्सना ईमेलद्वारे डाऊनलोड लिंक पाठवली जाते. तसेच सर्व चॅट्स डिलीट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, डेटा पूर्णपणे हटवण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि कायदेशीर किंवा सुरक्षेच्या कारणास्तव काही डेटा राखून ठेवला जाऊ शकतो, असे ओपनएआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आता युजर्सच्या नाराजीनंतर ओपन एआय काही बदल करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीचा फायदा अँथ्रोपिकला होईल असा विश्वास अनेकांना वाटत आहे.
Comments are closed.