रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिसेप्शनला बॉलीवूड स्टार्सने लावली हजेरी – Tezzbuzz

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. हे दोघेजण आता लग्नबंधनात अडकले आहेत, तर त्यांच्या या लग्नाला त्यांनी एक नाव दिले होते ते म्हणजे “विरोश”. तर वेडिंगच ठिकाण अगदी शाही पद्धतीचं होत उदयपूरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण होत. तर रश्मिका आणि विजय यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये चाहत्यांच्या मेजवानीचे आयोजन केले होते. आणि 4 मार्च रोजी बुधवारी हैदराबादमध्ये एक भव्य  रिसेप्शन समारंभ पार पडला. तर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिसेप्शनला स्टार्सनी खास हजेरी लावली होती.

या  समारंभाला अभिनेत्री नीना गुप्ता तिच्या पती विवेक मेहरासोबत या समारंभाला उपस्थित होती. दोघांनी रश्मिका आणि विजयसोबत सेल्फी काढला. विशेष म्हणजे, हा फोटो नीनाची मुलगी मसाबा हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मसाबा हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्हा दोघांचेही अभिनंदन. तुमचे आयुष्य प्रेम, आनंद आणि उत्तम आरोग्याने भरलेले असो.

आयकॉन चिरंजीवी स्टायलिश पद्धतीने समारंभात पोहोचले. नागार्जुन आणि त्यांची पत्नी अमला अक्किनेनीसोबत स्टायलिश एन्ट्री केली. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य देखील उपस्थित होता. तेलुगू रोमँटिक “द फॅमिली स्टार” मध्ये विजयसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील या समारंभाला उपस्थित होती आणि त्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले. चित्रपट निर्माते करण जोहर, होमी अदजानिया आणि दिनेश विजान, अभिनेता राणा दग्गुबती,कृती सॅनन, यांनीही या समारंभाला हजेरी लावली.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक राजकीय नेते देखील रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. विजयने (vijay)दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले आहे. रश्मिका यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.  2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीता गोविंदम’ चित्रपटाच्या सेटवर रश्मिका आणि विजय यांची मैत्री झाली आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. जवळजवळ तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, त्यांनी आता लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

नवाबी घराण्याचा वारसा, पण या स्टार किड्सचा पहिला चित्रपट ठरला होता फ्लॉप

Comments are closed.