नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्… पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणा
नांदेड क्राईम न्यूज : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात धक्कादायक खूनप्रकरण उघडकीस आले आहे. नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याच्या रागातून 22 वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून ठार मारण्यात आल्याची घटना 3 मार्च रोजी पहाटे मौजे थडीसावळी येथे घडली. मयत तरुणाचे नाव दुर्गेशसिंह ठाकूर (रा. मुतण्याळ, ता. बिलोली) असे आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रीशियन होता. (Nanded Crime News)
Nanded Crime News: घरातून उचलून नेऊन मारहाण
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेशसिंह याचे थडीसावळी येथील नातलगातील एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचा संशय होता. ही बाब महिलेच्या कुटुंबियांना समजताच संतापलेल्या नातेवाईकांनी 3 मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास दुर्गेशसिंहच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने उचलून थडीसावळी येथे आणले.
तेथे “आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस?” असा जाब विचारत आरोपींनी दुर्गेशसिंह आणि संबंधित महिलेला केबलच्या वायरने मारहाण केली. दुर्गेशसिंहच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला उलट्या होऊन तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Nanded Crime News: सात जणांवर खुनाचा गुन्हा
या प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशन (Ramtirth Police Station) येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजूसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर (रा. थडीसावळी), तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर (रा. निर्मल, तेलंगणा) यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना शनिवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Nanded Crime News: गावात तणाव; पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, घटनेनंतर थडीसावळी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या निर्घृण हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.