पनवेल पालिका स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेचे नितीन गावंड यांचा अर्ज दाखल
पनवेल महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकारी नानासाहेब कामथे यांच्याकडे हा अर्ज दिला असून लवकरच गावंड यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मशाल चिन्हावर पाच नगरसेवक निवडून आले आहेत. पनवेल परिसरातील दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी नितीन गावंड हे काम करतील असा विश्वास शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला आहे. गावंड हे जुने शिवसैनिक असून त्यांना पनवेलमधील विविध नागरी समस्यांचा अनुभव आहे. महापालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात आमचे सर्व नगरसेवक सक्षमपणे विरोध करतील असा विश्वास उपनेते बबन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, गटनेत्या लीना गरड, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, प्रगती पाटील, कैलास पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव, अॅड. समाधान काशीद, तालुकाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.