हॉटेलमध्ये ‘ती’ एकटी होती अन् तो आला… पाकिस्तानी क्रिकेटरचं हाउसकीपिंग महिलेसोबत नको ते कृत्य
T20 विश्वचषक 2026 दरम्यान पाकिस्तानी खेळाडूने हॉटेल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका पाकिस्तानी क्रिकेटपटूवर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी कथित छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संबंधित खेळाडूवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र त्या खेळाडूचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
ही घटना श्रीलंकेतील कँडी येथील एका हॉटेलमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानने सुपर-8 फेरीतील आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या अहवालानुसार कँडी येथील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये ही घटना घडली. त्या वेळी पाकिस्तानचा संघ याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होता.
पाकिस्तानी क्रिकेटपटूवर आरोप…
सूत्रांनी टेलिकॉम एशिया स्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्ध सुपर-8 सामना होण्यापूर्वी एका पाकिस्तानी खेळाडूने हॉटेलमधील महिला हाउसकीपिंग कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी हॉटेलच्या लॉबीमध्ये एकटी होती, त्या महिलेने जोरात आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर हॉटेलमधील इतर कर्मचारी तिच्या मदतीला धावून आले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पाकिस्तान संघाचे टीम मॅनेजर नावीद चीमा यांना देण्यात आली.
हॉटेल प्रशासनाची कठोर कारवाईची मागणी
अहवालानुसार गोल्डन क्राउन हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित खेळाडूवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र टीम मॅनेजर नावीद चीमा यांनी खेळाडूच्या वतीने हॉटेल व्यवस्थापनाची माफी मागितली आणि त्या चुकीच्या वर्तनासाठी खेळाडूवर दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे हा प्रकार संघाच्या पातळीवरच निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पीसीबीकडून कठोर कारवाईची शक्यता
जरी खेळाडूची ओळख अद्याप उघड झालेली नसली तरी हे प्रकरण इथेच थांबण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) शिस्तपालन समितीकडून या प्रकरणावर कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.
या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेटमधील जुने वादही पुन्हा चर्चेत आले आहेत. अहवालानुसार, गेल्या वर्षी फलंदाज हैदर अली मँचेस्टर पोलिसांनी अटक केली होती. पाकिस्तान शाहीनच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. तसेच, मलेशिया दौऱ्यादरम्यान संघाचा मसाजर मलंग अली याच्यावरही महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता आणि त्यालाही दंड ठोठावण्यात आला होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.