Chandrapur News – चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड; वडेट्टीवारांचा धानोरकरांना धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूरमध्ये संधी असतानाही आपापसातील मतभेदांमुळे सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी महासभा बोलावण्यात आली. त्यात एकूण सोळापैकी काँग्रेसच्या वाट्याला सात जागा आल्या असल्या तरी, या सर्व सातही जागांवर विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नेमल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक नाराज झाले आणि महासभेवर बहिष्कार टाकत बाहेर पडले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील सोळा सदस्यांच्या नावांवर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. यासाठी महानगरपालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी दिलेल्या नावांची घोषणा महापौरांनी केली.

महापौरांची निवडणूक झाल्यानंतर तत्काळ स्थायी समितीची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, एक महिना उलटूनही ही निवड न झाल्याने नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष होता. काँग्रेससह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेत स्थायी समिती निवडणुकीबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी विशेष सभा घेत स्थायी समिती सदस्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सात, भारतीय जनता पक्षाचे सहा, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन व काँग्रेसचा मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक असे एकूण सोळा सदस्य या स्थायी समितीत असणार आहेत. मात्र काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सर्व नगरसेवक हे वडेट्टीवार गटाचे आहेत. त्यामुळे खासदार धानोरकर यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडीच्या वेळी खासदार धानोरकर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक सदस्य हा धानोरकर यांच्या विश्वासातील मानला जातो.

स्थायी समिती सदस्य

काँग्रेस

वसंत देशमुख
सचिन कात्याल
राजेश अडूर
संजीवनी वासेकर
चंदा वैरागडे
सोफिया तवांगर
मजा करण्यासाठी

भाजप

सुभाष कासनगोटूवार
संजय कंचर्लावार
प्रज्वल कडू
सारिका सांदुरकर
सविता सरकार
पुष्पा उराडे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मनस्वी गिर्हे
श्रुती घटे

जनविकास सेना

पप्पू देशमुख

Comments are closed.