दुबईमध्ये मुलीसोबत अडकली अभिनेत्री लारा दत्ता; भावुक होत म्हणाली, आम्ही खूप घाबरलोय, स्फोटांचा आवाज ऐकू येतोय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे दुबईला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक कलाकार दुबईत अडकले आहेत. अभिनेत्री लारा दत्ताही मुलीसोबत दुबईत आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप भावुक झाली आहे.

लाराने व्हिडिओमध्ये सांगितले की, मुलगी सायरासोबत ती दुबईमध्ये आहे. दुबईत गेल्या 3 वर्षांपासून माझे घर आहे. मी माझा बहुतेक वेळ इथेच घालवते. इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून मी इथेच आहे. मी एका ब्रँड शूटसाठी दुबईमध्ये होते. तेव्हा मला स्टुडिओच्या वर स्फोट आणि क्षेपणास्त्रांचे आवाज ऐकू आले आणि आम्ही स्टुडिओतून पळत सुटलो. तसेच क्षेपणास्त्र हल्ला होताना पाहिला. गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. माझे पती महेश कामानिमित्त बाहेर आहेत. आम्ही खूप घाबरलो आहोत. हे सर्व भयावह आहे. स्फोट होत आहेत. जेट विमाने वर उडत आहेत. आम्ही सुरक्षित ठिकाणी राहतो पण स्फोटांमुळे खिडक्या हादरतात. तसेच लारा पुढे म्हणाली, यूएई सरकार चांगले काम करत आहे. ते सर्वांची काळजी घेत आहेत. त्याचबरोबर तिने सांगितले की, ती हिंदुस्थानात परतण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

Comments are closed.