Mental Health : स्ट्रेस-टेन्शन कमी करण्यासाठी घरात करता येतील हे बदल

स्पर्धेच्या या युगात अनेकजण डिप्रेशन आणि स्ट्रेसचे शिकार आहेत. डिप्रेशन एक मूड डिसऑर्डर आहे, ज्यात व्यक्ती निराश असते. व्यक्तीला कोणत्याही गोष्टीत रस उरत नाही, काही करावेसे वाटत नाही. यावर उपाय म्हणून अनेकजण डॉक्टरांचा तर काहीजण थेरपीचा आधार घेतात. बरेच लोक मन शांत करण्यासाठी शांत ठिकाणी जसे की, डोंगर, नद्या अशा शहरांपासून लांब असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जातात. पण, नोकरी करणाऱ्यांना दरवेळी हे शक्य होईल असं नाही. तुम्ही राहत्या घरीही काही बदल करून स्ट्रेस-टेन्शन कमी करू शकता.

सुगंधित कॅडल्स –

ऑफिसमूधन घरी आल्यावर सुगंधित कॅडल्स लावू शकता. यामुळे मूड बदलेल आणि थकवाही दूर होईल.

झाडं –

झाडांमुळे आपल्या घराचा लूकच नाही तुमचा मूडही उत्तम राहतो. झाडांमुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक बदल होतो. ज्यामुळे स्ट्रेसपासून मुक्ती मिळते.

म्यूझिक –

स्ट्रेस-टेन्शन कमी करण्यासाठी म्यूझिकसारखं औषध नाही. म्युझिक आपल्या भावनांना प्रभावित करतं. पण तुम्ही कोणती गाणी ऐकताय याला देखील महत्त्व आहे.

अशा प्रकारे  काही बदल करून तुमची खोली मन शांत करणारी ठेवल्यास ऑफिस किंवा बाहेरची कामं करून कितीही थकलात, स्ट्रेस असला तरी या ट्रिक्समुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

हेही वाचा – Kidney Stone Diet : किडनी स्टोन असल्यास थाळीत करा ‘हे’ बदल

Comments are closed.