NZvsSA: काळी माती आणि नाणेफेक! न्यूझीलंडच्या विजयामागचे रहस्य फिन ऍलनने केले उघड

आयसीसी टी२० विश्वचषकाच्या इतिहासात जलद शतक करणारा न्यूझीलंडचा सलामवीर फिन ऍलनने त्याच्या संघाच्या यशामागचे रहस्य उघड केले आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात अशा संघाचा पराभव केला ज्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. बुधवारी (४ मार्च) झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत केले.

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऍलन म्हणाला, “आम्हाला केवळ कर्णधार मिचेल सॅंटनरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याची अपेक्षा होती आणि तसेच झाले. त्यानंतर केवळ चांगली कामगिरी करत सामन्यावर पकड बनवण्याचा प्रयत्न. तसेच या स्पर्धेआधी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेचा फायदा झाला. पाच सामने ते ही काळ्या मातीवर, यामुळे आमचा चांगला सराव झाला.”

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. त्यांना सुरूवातीलाच कोल मॅककॉन्चीने आव्हान दिले. त्याने दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉक रियान रिकल्टन यांना बाद केले. त्यानंतर रचिन रविंद्र आणि मॅट हेन्री यांनी बाकी काम पूर्ण केले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजीबाबत ऍलन म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी खरी सुरूवात केली. ज्या विकेटवर फलंदाजी करणे सोपे होते, तेथे सुरूवातीला विकेट्स घेणे महत्वाचे होते. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मजबूत होती, यामुळे आमच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली.”

“भारताविरुद्ध येथे शेवटी सामना खेळला होता, तेथे काळ्या मातीची खेळपट्टी होती. त्यामुळे आजच्या सामन्यात कसा खेळ करायचा याची माहिती होत आणि त्याचा फायदा झाला,” असेही ऍलनने पुढे म्हटले आहे.

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याबाबत ऍलन म्हणाला, “अंतिम सामना खेळणे नेहमीच खास असते. आयुष्यात अशा संधी फार कमी येतात. रविवारचा सामन्यात चांगल्या प्रदर्शनाचा प्रयत्न असणार आहे.”

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऍलनने ३३ चेंडूत नाबाद १०० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने २०२१मध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता आणि तेव्हा ते ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले होते. तसेच टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा हा पहिला विजय ठरला आहे. मागील झालेल्या पाचही सामन्यात दक्षिण आफ्रिकाच जिंकला होता. त्या सर्व सामन्यांचा वचपा आता न्यूझीलंडने काढला आहे.

Comments are closed.