आज, उद्या, पुढचा आठवडा, काहीतरी…; डॅरेन सॅमी संतापला, वेस्ट इंडिजचा संघ भारतात अडकला, काय घडल

डॅरेन सॅमी न्यूज मराठी : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. वेस्ट आशियातील काही भागांमध्ये एअरस्पेस बंद करण्यात आल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या काही संघांना परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच वेस्ट इंडीजचा संघही भारतात अडकून पडला आहे.

1 मार्च रोजी टीम इंडियाकडून पराभूत होत स्पर्धेबाहेर पडलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाला अजूनही मायदेशी परतता आलेले नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी घर जाण्याची इच्छा व्यक्त करत मदतीची विनंती केली आहे. त्यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडियावर केलेली फक्त पाच शब्दांची पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

“मला फक्त घरी जायचं…”

डॅरेन सॅमी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला फक्त घरी जायचं आहे.” त्यांच्या या भावनिक संदेशाने वेस्ट इंडीजच्या चाहत्यांचे मन हेलावले आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून संघ बाहेर पडल्यानंतर भारतातून परतीचा प्रवास लांबला असून, नियोजित प्रस्थानाऐवजी आता त्यांना अनिश्चिततेत वाट पाहावी लागत आहे.

चार दिवसांपासून प्रतीक्षा

एअरस्पेसवरील निर्बंधांमुळे वेस्ट इंडीजचा संघ नियोजित वेळेत उड्डाण करू शकला नाही. त्यामुळे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ गेल्या चार दिवसांपासून मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. कदाचित कुटुंबाची आठवण येत असल्यानेच सॅमी यांनी सोशल मीडियावर घरवापसीसाठी मदतीची हाक दिली असावी.

क्रिकेट वेस्ट इंडीजचे स्पष्टीकरण

क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय एअरस्पेसवरील निर्बंधांमुळे संघाच्या भारतातून परतीला विलंब झाला आहे. मात्र सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सुरक्षित असून त्यांची भारतात योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ICC आणि अधिकाऱ्यांशी समन्वय

क्रिकेट वेस्ट इंडीजने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत बोर्ड आयसीसी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. यापूर्वी झिम्बाब्वेच्या संघाला विशेष मार्ग तयार करून मायदेशी पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे कॅरिबियन संघालाही लवकरच विशेष व्यवस्थेद्वारे परत पाठवले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा –

Ind vs Eng Semi-Final Tickets : भारत-इंग्लंड सेमीफायनलचं तिकीट न मिळाल्याने आमदार संतापले, विधानपरिषदेत राडा, म्हणाले, ‘पोलीस अन् अधिकाऱ्यांना मॅचची तिकिटं पण…’

आणखी वाचा

Comments are closed.