T20 WC 2026: भारताचा 250 धावांचा डोंगर, टीम इंडियाचा विश्वविक्रम!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला शिवम दुबेच्या रूपाने पाचवा धक्का बसला, जो धावबाद झाला. त्याआधी सूर्यकुमार यादवच्या रूपाने चौथा धक्का बसला होता; सूर्या ११ धावा करून बाद झाला. त्यांच्यापूर्वी संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली. संजूने इशानसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९७ आणि शिवमसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. इशान ३९, तर अभिषेक ९ धावा करून बाद झाले. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया या सामन्यात कोणताही बदल न करता मैदानात उतरली आहे, तर इंग्लंडने संघात एक बदल केला आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल.
च्याभारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधर), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
च्याइंग्लंड प्लेइंग इलेव्हन: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम कुरन, विल जॅक, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.
Comments are closed.