मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी; वर्षभरात 16 लाख प्रवाशांकडून 1.31 कोटींचा दंड वसूल
लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात तिकिट तपासणी मोहिम राबवत 2025-2026 या आर्थिक वर्षात 16.16 लाख फुकट्या प्रवाशांकडून 1.31 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या 1.10 लाख प्रवाशांकडून 3.51 कोटी रुपये इतका दंड वसूल केला.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 15.90 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी वसूल केलेल्या 68.56 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 4 टक्क्यांनी वाढली आहे.
मध्य रेल्वेमध्ये 94 वातानुकूलित लोकल सेवा चालवल्या जातात, त्यापैकी 14 सेवा या वर्षी हार्बर लाईनवर सुरू करण्यात आल्या आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमेमुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1.10 लाख फुकट्या प्रवाशांकडून 3.51 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला, ज्यामध्ये दररोज सरासरी 401 प्रवाशांवर कारवाई करत 1.27 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
Comments are closed.