झिम्बाब्वेचा पहिला गट हरारेकडे रवाना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पहिला गट बुधवारी हरारेकडे रवाना झाला. 2 मार्च रोजी मायदेशी परतायचे नियोजन असतानाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर संघ हिंदुस्थानातच अडकला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वे संघाच्या परतीसाठी पर्यायी प्रवास व्यवस्था केली.

इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पश्चिम आशियाईतील हवाई क्षेत्र बंद असल्याने ही अडचण निर्माण झाली. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना याच मार्गाने परतायचे होते. झिम्बाब्वे क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंचा पहिला गट बुधवारी हिंदुस्थानातून रवाना झाला असून उर्वरित खेळाडू शुक्रवारी दुपारी निघणार आहेत. पूर्वी संघ दुबईमार्गे हरारेला जाणार होता, मात्र आता प्रवास मार्ग बदलून इथिओपियामार्गे परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments are closed.