मॉर्गन स्टेनली बँकेने 2500 कर्मचाऱ्यांना काढले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील मॉर्गन स्टेनली बँकेने अडीच हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 3 टक्के इतकी आहे. ही कर्मचारी कपात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू करण्यात आली आहे. बँकेतील कर्मचारी कपात तीन मोठय़ा विभागातून म्हणजेच इन्स्टिटय़ूशनल सिक्युरिटीज, वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्वेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये करण्यात आली आहे. या कर्मचारी कपातीबद्दल मॉर्गन स्टेनलीने अधिकृतपणे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याआधीही मागील वर्षी कंपनीने याच महिन्यात दोन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ही कर्मचारी कपात अशावेळी केली आहे, ज्यावेळी कंपनीने 2025 मध्ये रेकॉर्डब्रेक 70.6 अब्ज

डॉलरची कमाई केली आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीमध्ये 47 टक्के वाढ दिसली. 31 डिसेंबर 2025 पर्यंत कंपनीच्या 40 हून अधिक देशांत एकूण 82,992 कर्मचारी काम करत होते. बँकेच्या म्हणण्यानुसार, एआय काम करण्याची पद्धत बदलणार आहे. काही दिवसांपूर्वी जॅक डोर्सी यांची कंपनी ब्लॉकने 4 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे या कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या 6 हजार राहिली आहे.

Comments are closed.