IND Vs ENG – फटकेबाजीचा अभिषेक नाहीच
हिंदुस्थानी संघाचा सर्वात झंझावाती असलेल्या अभिषेक शर्माच्या फटकेबाजीची वात उपांत्य फेरीतही पेटली नाही. याच मैदानावर गेल्या वर्षी इंग्लिश गोलंदाजीला पह्डून काढताना त्याने 135 धावा काढल्या होत्या. मात्र आज त्याला त्या खेळीच्या अंकाची बेरीज असलेला 9 आकडाच गाठता आला. वर्ल्ड कपची सुरुवात गोल्डन डकने करणाऱ्या अभिषेकने शून्यांची हॅटट्रिक करत दुर्दैवी विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. वर्ल्ड कपचा सातवा सामना खेळत असलेला अभिषेक केवळ एकाच सामन्यात अर्धशतक साजरे करू शकला. पूर्ण स्पर्धेत 0, 0, 0, 15, 55, 10 आणि 9 अशा धावा काढत त्याला फक्त 89 धावाच करता आल्या आहेत. त्याच्या या अपयशामुळे वर्ल्ड कपमध्ये त्याच्या फटकेबाजीचा अभिषेक झालाच नाही.
Comments are closed.