परवानगी गुलामांना दिली जाते, अमेरिकेच्या मेहेरबानीवर आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे ही शरमेची बाब – संजय राऊत
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यात आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध फक्त आखाती देशातच नाही तर जगासाठी धोकादायक आहे, त्यामुळे आता युद्धखोर राष्ट्रांविरोधात उभे राहणे ही काळाजी गरज आहे, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच हिंदुस्थानला आता अमेरिकेने गुलाम केले आहे, असे चित्र दिसत आहे, हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेला वाटले म्हणून किंवा त्यांना संशय असेल म्हणून ते कोणवरही हल्ला करतील, हे एक देश म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. इस्रायल आणि अमेरिकेला वाटेल की, नरेंद्र मोदी त्यांचे ऐकत नाही, ते स्वतंत्रपणे देशहिताचे निर्णय घेत आहेत, म्हणीन ते आमच्यावर हल्ला करतील हे एक देश म्हणून आम्ही कदापी खपवून घेणार नाही. इराणसोबत अशा गोष्टी घडत अशतील, तर हिंदुस्थानसराख्या मोठ्या राष्ट्राने याचा निषेध करायला हवा. नरेंद्र मोदी प्रचंड मोठे नेते आहे, असे त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते मानतात. त्यामुळे मोदी यांनी या युद्धात हस्तक्षेप करत हे युद्ध थांबवावे, असे ते म्हणाले. इराण आणि गाझामध्ये इस्रायलकडून सुरू असलेला नरसंहार त्यांनी थांबवायला हवा. एका देशाच्या प्रमुखाला ठार करा, अशी तेथील जनतेला चिथावणी देणे, हे निषेधार्ह आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
एका शाळेवर हल्ला करण्यात येतो आणि त्यात 200 मुली मारल्या जातात, याचे इस्रायलला, अमेरिकेला कौतुक असेल तर मानवतेच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थानने त्याचा निषेध करायला हवा. युद्धात कोणत्याही देशाची बाजू घ्या, असे आमचे म्हणणे नाही. आपल्या आग्रहावरून सागरी संचलनासाठी इराणचे नौदल आले होते. पाहुणे म्हणून ते आपल्याकडे आले होते, त्यांना सुखरुप पाठवणे, ही आपली जबाबदारी आहे. मात्र, हिंद महासागारात अमेरिका, इस्रायल ती युद्धनौका बुडवतात. त्या हल्ल्यात 90 नौसेनिकांचा मृत्यू झाला. या घटनेचाही हिंदुस्थानकडून निषेध होत नाही, हे दुःखद असल्याचे संजय राऊत म्हणाले. आता जगभराने अश्रू ढाळल्यानंतर सरकारने लोकलज्जेस्तव दुःख व्यक्त केले आहे.
या घटनेवरून देशाला आता कोणतेही राष्ट्रीय, परराष्ट्रीय धोरण नसल्याचे दिसत आहे. तसेच हिंदुस्थान कोणचातरी गुलाम म्हणून काम करतोय काय, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली आहे. अमेरिकेच्या इशाऱ्या प्रमाणे हिंदुस्थान नाचत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने आपल्याला रशियाकडून तेल खेरदीची परवानगी दिली आहे. परवानगी ही गुलाम राष्ट्रांना दिली जाते. रशियाकडून तेल खरेदी करण्याची हिंमत आमच्यात नाही, अमेरिकेच्या मेहेरबानीवर आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असून तर थूत आहे अशा जिंदगानीवर अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला केला.
आता जगातील अनेक राष्ट्रे अमेरिकेच्या युद्धखोरीविरोधात उभे राहतील. अमेरिका आणि इस्रायल ही दोन राष्ट्रे सध्या इराणविरोधात युद्धखोरी करत आहेत. हिंदुस्थानने नेहमी शांततेचा संदेश दिला. या गंभीर मुद्द्यावर सरकार गप्प आहे, या युद्धखोर लांडण्यांविरोधात उभे राहण्याची त्यांची हिंमत नाही, हे दिसून येत आहे. नाटोच्या अनेक देशांनी युद्धखोर अमेरिकेसोबत उभे राहणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्पनेच्या राष्ट्रप्रमुखांनी, ब्रिटनचे पंतप्रधान यांनी अमेरिकेसोबत राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हे युद्ध बराचकाळ चालेल, असे दिसत आहे. इराणची जनता झुंजार आहे. त्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. या युद्धाचे परिणाम जगासह हिंदुस्थानवरही होणार आहे. याचे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील, असे आम्हाला वाटत आहे. त्याचे परिणाम आतापासूनच दिसत आहेत. निर्यातीवर बंधने आली आहेत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतमाल, फळफळावळ, टेक्सटाईल अशा अनेक वस्तूंच्या निर्यातीवर बंधने आली आहेत. आता या परिस्थितीत सरकारकडे कोणतीही भूमिका नाही. आपले हजारो लोकं अडकले आहेत, त्याबाबतची सरकारकडे कोणतीही भूमिका नाही, या परिस्थितीत सरकार नेमके काय करणार आहे, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे, असे ते म्हणाले.
Comments are closed.