IND vs NZ: टी-20 विश्वचषक फायनलसाठी ICC कडून सामना अधिकाऱ्यांची घोषणा; ‘ऑन-फील्ड’ पंचांची नावे आली समोर

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) चा अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांचा इथपर्यंतचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून फायनलमध्ये जागा निश्चित केली, तर टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून तिकीट मिळवले. आता या ऐतिहासिक सामन्यासाठी ‘आयसीसी’ने सामना अधिकाऱ्यांची (Match Officials) घोषणा केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महामुकाबल्यात मैदानी पंचांची (On-field Umpires) जबाबदारी इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ सांभाळतील. विशेष म्हणजे, 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता, तेव्हाही रिचर्ड इलिंगवर्थ मैदानी पंच होते. ते सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये ही जबाबदारी पार पाडणार आहेत. इलिंगवर्थ हे अत्यंत अनुभवी पंच असून त्यांनी 2023 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही अंपायरिंग केले आहे. त्यांच्यासोबत असलेले एलेक्स व्हार्फ हे देखील आयसीसीच्या ‘एलिट पॅनेल’मध्ये समाविष्ट आहेत.

इतर सामना अधिकारी:
मॅच रेफरी: अँडी पायक्रॉफ्ट ही जबाबदारी सांभाळतील. तर दक्षिण आफ्रिकेचे अल्लाहुद्दीन पालेकर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असतील. 48 वर्षीय पालेकर यांचा मार्च 2025 मध्ये आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांनी या स्पर्धेत 6 सामन्यांत अंपायरिंग केले आहे. एड्रियन होल्डस्टॉक हे चौथ्या पंचाची जबाबदारी पार पाडतील.

Comments are closed.