जसप्रीत बुमराह किंवा संजू सॅमसन नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले ड्रेसिंग रुमचे स्पेशल मेडल

इंग्लंडविरुद्ध भारताने उपांत्य सामना जिंकत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर सगळीकडे संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांचे कौतुक केले. या दोघांव्यतिरिक्त एक असाही खेळाडू होता ज्याने उत्तम कामगिरी केली आणि तो पण त्या कौतुकास पात्र आहे. भारतीय व्यवस्थापकांनी त्याला ड्रेसिंग रुपमध्ये स्पेशल मेडल देत त्याच्या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.
इंग्लंडविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत २५४ धावा केल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसनने ८९ धावा (४२ चेंडू) केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना बुमराहने चांगलाच त्रास दिला. त्याने ४ षटकात ३३ धावा देत एक विकेट घेतली आणि हा सामना भारताने ७ धावांनी जिंकला. यानंतर संजूची सलामी आणि बुमराहने टाकलेले १६ वे, १८ वे षटक याचीच अधिक चर्चा होऊ लागली. या सामन्यामध्ये एक खेळाडू असा होता, ज्याने अष्टपैलू खेळी करत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली.
या सामन्यात हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी करताना १२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारत २७ धावा केल्या. त्यानंतर त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३८ धावा देत फिल सॉल्ट आणि सॅम करन यांच्या विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने खतरनाक वाटणाऱ्या जेकब बेथेलला धावबाद करण्यातही महत्वाचे योगदान दिले. यामुळे तो ड्रेसिंग रुमचा ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला.
हार्दिक म्हणाला, “स्टॅंडमध्ये मला माझा मुलगा आणि माहिका पाहत होते. यामुळे मला उत्तम प्रदर्शन करायचे होते.”
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लागोपाठ दुसऱ्यांदा खेळणारा भारत एकमेव संघ ठरला आहे. २०२४मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत दुसरे विजेतेपद जिंकले होते. आता गतविजेता न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Comments are closed.