फायनलमध्ये फ्लॉप झाले हे 4 स्टार्स, तर टीम इंडियाच्या अडचणी वाढणार! आता कमबॅक गरजेचं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात t20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना (फायनल) रंगणार आहे. (The T20 World Cup 2026 final match is set to take place between India and New Zealand) या धमाकेदार लढतीकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. ८ मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावण्याच्या अगदी जवळ आहे. इतिहास रचण्याची ही सुवर्णसंधी भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत हातची घालवू इच्छिणार नाही. टीम इंडियाचा विजय हा काही विशिष्ट खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे. जर ते ‘फ्लॉप’ झाले, तर भारताचे टेन्शन नक्कीच वाढेल.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माने धावा करणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंतची त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, त्यामुळे फायनलमध्ये स्वतःचे नशीब बदलण्याची त्याला मोठी संधी आहे. याशिवाय, ईशान किशनवारही सर्वांच्या नजरा असतील. तो या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आता फायनलमध्येही तो मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
Comments are closed.