अमेरिकेची आत्मसमर्पणाची मागणी फेटाळली, मरेपर्यंत इराण झुकणार नाही : पेझेश्कियान!

यासोबतच पेजेश्कियान यांनी आखाती देशांवरील हल्ल्याबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, आता शेजारी राष्ट्रांवर हल्ले होणार नाहीत, जोपर्यंत त्या देशांच्या भूमीतून इराणवर हल्ला होत नाही. इराणच्या मीडियानुसार, राष्ट्रपतींनी सांगितले की, देशाच्या अंतरिम नेतृत्व परिषदेने या निर्णयाला मान्यता दिली आहे.
इराणला या देशांसोबत तणाव वाढवायचा नाही आणि भविष्यात असे हल्ले टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या आठव्या दिवशी पेझेश्कियान यांचे वक्तव्य आले आहे. 28 फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने इस्रायलसह मध्य पूर्वेतील 10 हून अधिक देशांना लक्ष्य केले आहे.
दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) पर्शियन गल्फमध्ये एका तेल टँकरला ड्रोनने लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
तस्नीम न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, IRGC ने सांगितले की, प्रिमा नावाच्या टँकरने त्यांच्या नौदलाच्या वारंवार चेतावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. या इशाऱ्यांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हालचालींवर बंदी असून हा परिसर असुरक्षित असल्याचे म्हटले होते.
अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांनी अनुपम खेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!
Comments are closed.