साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 08 मार्च 2026 ते शनिवार 14 मार्च 2026

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या

मीन राशीत सूर्य ,चंद्र बुध त्रिकोणयोग. कार्याची दिशा निश्चित ठरवणे कठीण जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीला सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीधंद्यात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धक वाढतील. शुभ दिवस. 8, 12

वृषभ – प्रगतीची संधी मिळेल

मीन राशीत सूर्य, शुक्र शनि युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. चांगल्या व्यक्तींचा परिचय होईल. कलाक्षेत्रात मन रमेल. नोकरीधंद्यात वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. सप्ताहात संयम ठेवा. शुभ दि. 9, 14

मिथुन – कामे मार्गी लागतील

मीन राशीत सूर्य, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. कामे मार्गी लावा. दर्जेदार व्यक्तीचा सहवास लाभेल. साहित्य, कला क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडेल. नोकरीधंद्यात चांगला बदल घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट कामे मार्गी लागतील. शुभ दिवस. 8, 12

कर्क – उतावळेपण दूर ठेवा

मीन राशीत सूर्य, शुक्र प्लुटो लाभयोग. सर्वत्र कायदा पाळा. दुखापत, वाद टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीधंद्यात उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. फसगत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. प्रतिष्ठा जपा. शुभ दिवस. 8, 10

सिंह – महत्त्वाची कामे संपवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मीनेत सूर्य राश्यांतर. महत्त्वाची कठीण कामे संपवा. नम्रता ठेवा म्हणजे वाद टळेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठोर निर्णय घ्यावा लागेल. शुभ दिवस. 8, 12

कन्या – चालक सावध रहा

मीनेत सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. दौर्यात वाहनाचा वेग कमी ठेवा. चौफेर सावध रहा. जुना वाद वाढवू नका. नोकरीत व्याप राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. चातुर्याचा वापर करा. यश खेचावे लागेल. शुभ दिवस. 8, 9

तूळ – दर्जेदार परिचय होतील

मीनेत सूर्य राश्यांतर, बुध गुरू त्रिकोणयोग. महत्त्वाची कठीण कामे या सप्ताहात करून घ्या. दर्जेदार परिचय होतील. कला, क्रिडा, साहित्यात प्रेरणादायक स्थिती असेल. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाष्य कराल. शुभ दिवस. 9, 10

वृश्चिक – प्रवासात काळजी घ्या

मीनेत सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. कायद्याचे पालन करून कामे करा. प्रवासात काळजी घ्या. सहनशिलता ठेवा. नोकरीधंदा टिकवणे क्रमप्राप्त आहे. नविन ओळखी उपयुक्त ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टी ठेवा. शुभ दिवस. १३, १४

धनु – योजना गतिमान होतील

मीनेत सूर्य राश्यांतर, बुध गुरू त्रिकोणयोग. किरकोळ अडचणींवर मात करून तुमच्या क्षेत्रात मोठे यश संपादन कराल. नोकरीत चांगली संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करा. योजनांना गती मिहेल. शुभ दिवस. 8, 13

मकर – अडचणींतून मार्ग शोधा

मीनेत सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. अनाठायी खर्च होतील. प्रकृतीची काळजी घ्या. शत्रूला कमी लेखू नका. धंद्यात उधारी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक विरोधक वाढतील. प्रतिष्ठा जपता येईल. शुभ दिवस. 8, 9

कुंभ – रागावर ताबा ठेवा

मीनेत सूर्य राश्यांतर, बुध गुरू त्रिकोणयोग. प्रकृती सुधारेल. चांगले परिचय होतील. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. रागावर ताबा ठेवा. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाष्य कराल. शुभ दिवस. 8, 12

मीन – वाद वाढवू नका

स्वराशीत सूर्य राश्यांतर, शुक्र शनि युती. गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती योग्य असेल असे समजू नका. वाहनावर ताबा ठेवा. कायद्याला धरून काम करा. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दिवस. 9, 14

Comments are closed.