कर्तृत्ववान महिलांचा ‘ममता पुरस्कारा’ने गौरव, महिला दिनानिमित्त जाणीव संस्थेचा उपक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा आदी क्षेत्रांत प्रसिद्धीपासून दूर राहून तळागाळात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘ममता पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. जाणीव संस्थेच्या वतीने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजिका कल्पना सरोज यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले.

महानगर टेलिपह्न निगम कामगार संघाद्वारे स्थापन झालेल्या, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या ‘जाणीव’ संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या 12 नगरसेविका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेविकेचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर संगीतमय वाद्यवृंदाचा आनंद उपस्थित महिलांनी लुटला.

या वेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनुया सावंत, उपनेत्या आणि महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या विशाखा राऊत, नगरसेविका श्रद्धा जाधव, पद्मजा चेंबूरकर, संपदा मयेकर, अबोली खाडये, हेमांगी वरळीकर, सुप्रिया दळवी, उर्मिला पांचाळ, युगंधरा साळेकर, माधुरी मांजरेकर आदी उपस्थित होते. या सोहळ्यात वैदेही सावंत, अनिता नारकर, प्रियंका जोशी, सुरेखा गावंडे व लक्ष्मी जाधव, अनुराधा बुधवंत यांचा सत्कार करण्यात आला.

Comments are closed.