पगार 63,61,79,82,000; गुगलकडून सुंदर पिचाई यांना 6,400 कोटींचे पॅकेज
गुगल कंपनीने पुढील तीन वर्षांसाठी सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार थेट 692 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 6 हजार 400 कोटी रुपये केला आहे. या भरमसाट पगारामुळे सुंदर पिचाई हे जगात सर्वात जास्त पगार मिळवणारे सीईओ बनले आहेत. कंपनीने पिचाई यांच्या पॅकेजमधील जास्त भाग परफॉर्म्स स्टॉक यूनिट्समध्ये दिला आहे. याचे टार्गेट व्हॅल्यू 126 मिलियन डॉलर आहे. याला दोन भागांत विभागले आहे. पिचाई यांना पुढील तीन वर्षांपर्यंत 84 मिलियन डॉलरचे रिस्ट्रिक्टेड स्टॉकसुद्धा मिळणार आहेत. कंपनीत असेपर्यंत दर महिन्याला मिळतील. वार्षिक पगार दोन मिलियन असेल.
ऑगस्ट 2015 मध्ये सुंदर पिचाई हे सीईओ बनले. तेव्हापासून गुगलचे मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास सात पट वाढून 535 बिलियन डॉलरहून 3.6 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. गुगलने आपल्या वेमो सेल्फ ड्रायविंग टॅक्सी आर्म आणि विंग ड्रोन डिलिवरी स्टार्ट अपच्या ग्रोथशी जोडलेले 350 मिलियनपर्यंतचे दोन नवीन स्टॉक इन्सेंटिव जोडले आहे. पिचाई यांना तीन वर्षांत 130 मिलियन डॉलरचे टार्गेट व्हॅल्यूचे वेमोचे स्टॉक आणि 45 मिलियनचे विंग एविएशनचे शेअर मिळतील. पिचाई यांना जास्तीत जास्त 692 मिलियनचा पगार मिळेल. यात स्टॉक आणि सॅलरी 391 मिलियन डॉलरचे बेसलाईन अमाऊंट असेल. रेग्युलेटरी फायलिंगच्या माहितीनुसार, सुंदर पिचाई आणि त्यांची पत्नी अंजली यांच्याकडे एकूण 1.67 मिलियन गुगल शेअर आहेत. याची किंमत 498 मिलियन डॉलर होती.
गुगलचे फाऊंडर सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज अजूनही सुपर वोटिंग क्लास बी स्टॉकच्या मालकी हक्काद्वारे कंपनीला कंट्रोल करतात. त्यांच्याकडे 56 टक्के निर्णय घेण्याची क्षमता आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांनी कंपनीचे आर्थिक वर्ष 2025 मध्ये 96.5 मिलियन डॉलरची कमाई केली. यामुळे जवळपास 84 मिलियन डॉलर स्टॉक अवॉर्ड्समधून मिळाले. हा आकडा वर्षभरापूर्वी 48.5 मिलियनहून जास्त होता. ऍपलचे टीम कूक यांनी 2025 मध्ये 74.3 डॉलरची कमाई केली आहे.
Comments are closed.