INDvsNZ Final: नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कपची फायनल, जाणून घ्या अहमदाबादचे हवामान रिपोर्ट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (८ मार्च) आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. सामन्यावेळी पाऊस पडेल की संपूर्ण षटके होतील, विजेतेपदाच्या या महत्वाच्या सामन्यावेळी कसे हवामान असेल ते जाणून घेऊ.

क्रिकेटविश्वातील हे दोन बलाढ्य संघ असून भारत तिसऱ्या आणि न्यूझीलंड पहिल्या टी२० विश्वचषकाचे चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भारताने टी२० विश्वचषकात न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही आणि मागील काही आयसीसी स्पर्धांमुळे भारतासाठी अहमदाबादचे मैदान काही खास ठरले नाही. आता भारत सलग दोनदा विजेतेपद जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करेल का?

भारताने हा सामना जिंकला तर ते अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर करतील. ते टी२० विश्वचषकाचे यजमानपद भुषविताना विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरेल, गतविजेता राहून पुन्हा एकदा चॅम्पियन आणि तीन टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी हे दोन विक्रमही भारताच्या नावावर होऊ शकतात.

मार्च महिना असून पावसाचा अंदाज खूपच कमी आहे, मात्र दवाचा त्रास होऊ शकतो. एक्युवेदरनुसार, दुपारी तापमान ३४ ते ४१ डिग्री सेल्सियस दरम्यान असणार आहे. सामन्यावेळी हवामान स्वच्छ राहणार असून चाहत्यांना संपूर्ण षटकांचा सामना पाहायला मिळेल.

या सामन्यावेळी खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीची असणार आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर गोलंदाजांची परिक्षा असणार आहे. तसेच चाहत्यांना मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळणार आहे. दव हे मोठी भुमिका निभावतील. या स्पर्धेच्या काही सामन्यांमध्ये दवामुळे सामन्याचे निकाल पालटले आहेत. येथे कर्णधारांचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय असण्याची शक्यता आहे.

आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड मधील ही मागील ६ वर्षातील तिसरी भेट असणार आहे. २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ टी२० विश्वचषक.
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारताविरुद्ध २-१ने पुढे आहे. त्यामध्ये २००० चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप यांचा समावेश आहे. भारताने न्यूझीलंडला २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये पराभूत केले होते.

भारत चौथ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेतील ९ पैकी ६ संघ लक्ष्याचा पाठलाग करताना विजेतेपद जिंकले आहेत. भारताने २००७ आणि २०२४मध्ये प्रथम फलंदाजी करताना विजेतेपद जिंकले आहे, दोन्हीपण सामन्यांचा निकाल शेवटच्या षटकामध्ये लागला.

Comments are closed.